संपादकीय
NPS मंजूर झाले; आता अंमलबजावणीला किती काळ? स्थायी समितीची मंजुरी हा शेवटचा टप्पा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची सुरुवात आहे! बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अर्थात NPS लागू करण्याच्या निर्णयाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याची बातमी निश्चितच महत्त्वाची आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी जोडलेल्या मोठ्या आर्थिक व्यवस्थेला संस्थात्मक स्वरूप मिळण्याचा…
